“अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर…”; रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला नितेश राणेंच प्रत्युत्तर

Nitesh Rane | टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल (4 जुलै) मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातची होती, यावरुन राजकीय वर्तुळात टीका केली जात आहे.

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त करत टीका केली होती. टीम इंडिया वर्ल्डकपसह महाराष्ट्रात,विशेष करुन मुंबईत येत आहे. मग, ही रॅली महाराष्ट्रातील बसमधूनच म्हणजेच मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी, असं रोहित पवार म्हणाले होते.

ओपन डेक बसवरून राजकारण तापलं

रोहित पवारांच्या या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप नेते नितेश राणे यांनी याला प्रत्युत्तर दिलंय. “अदानींचा एक खास ड्राईव्हर महाविकास आघाडीत आहे. तो मुंबईत आल्यावर अदानींची गाडी चालवतो. त्याच ड्राईव्हरने बसवर टीका केली होती आणि संध्याकाळी वानखेडेमध्ये फोटो काढण्यासाठी रोहित शर्माच्या मागे पळत होते.”, असा टोला नाव न घेतला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.

नितेश राणे यांचा रोहित पवारांना टोला

तसंच वर्ल्डकप गुजरात संघ नाही तर, भारत देश जिंकला आहे आणि बेस्टच्या बसची अवस्था चांगली नव्हती म्हणून गुजरातवरुन बस मागवण्यात आल्या, असंही आमदार नितेश राणे म्हणाले. काही लोक सकाळी उठून गुजराती समाजावर टीका करतात आणि रात्री गुजराती लोकांच्या लग्नात जाऊन नाचतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी नितेश राणे यांनी रोहित पवारांचा डबल ढोलकी असा उल्लेख केला. शेंबड्यासारखं पहिले बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या मागे पळत बसायचं हा डबल ढोलकीपणा आहे, असा टोला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला आहे.

News Title – Nitesh Rane on Rohit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

लठ्ठपणा कमी करेल, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील; गूळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे

वंचितला राम राम केलेल्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; थेट म्हणाले…

लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?; सोशल मीडियावर झाला खुलासा

शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा