“तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळला नाही…”, निलेश राणेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

Nilesh Rane | नारायण राणे (Nilesh Rane) यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. तुम्हाला सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळाला नाही. अशा भावना निलेश राणेंनी (Nilesh Rane) सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली. खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून काम करणार असल्याचं निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले.

भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी (Nilesh Rane) पोस्ट केली. त्यामध्ये निलेश राणेंनी नारायण राणेंचा नगरसेवक ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला.

निलेश राणेंची सोशल मीडियावर पोस्ट

1958 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग सहा वेळा आमदार (1 पोटनिवडणूक), 2014 ते 2024 विधानपरिषद 1 वेळा, राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभा खासदार.

ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही.

तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही.

जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही.

कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार.  तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे.

News Title – Nilesh Rane Social Media Post About Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या

खासदार झाल्यानंतर कंगना रनौतने केली सर्वात मोठी घोषणा!

“तुला जिवंत राहायचं की नाही?”; नवनाथ वाघमारेंना जीवे मारण्याची धमकी

पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज