“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी काल लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी मात्र इंग्रजीतून शपथ घेतली. नगरमध्ये लोकसभा निवडणुकीत इंग्रजी भाषेचा मुद्दा प्रचंड गाजला होता.

अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला.प्रचार दरम्यान सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात बरंच शाब्दिक युद्ध झालं. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते.

सुजय विखे यांनी इंग्रजीवरून लंके यांना डिवचले होते

मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हानच विखे पाटील यांनी दिलं होतं. या आव्हानाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. याला इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असं प्रत्युत्तर लंके (Nilesh Lanke) यांनी दिलं होतं.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लंके म्हणाले होते की, मी आता थेट संसदेत जाऊन फडाफडा इंग्रजी बोलत असतो आणि काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लंके यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली. याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. इंग्रजीतून बोलून लंके यांनी अप्रत्यक्षपणे विखे पाटलांना एकप्रकारे टोलाच लगावला होता. आता लंके समर्थकांनी देखील विखे पाटलांना डिवचले आहे.

लंके समर्थकांकडून इंग्रजीतून बॅनरबाजी

लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे. लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर इंग्रजीत बॅनर लावून एकप्रकारे सुजय विखे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. या बॅनरवर ‘आय निलेश ज्ञानदेव लंके, डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’, असं लिहिण्यात आलंय. या बॅनरची सध्या अहमदनगरमध्ये जोरदार चर्चा सुरू आह. आता या बॅनरला विखे पाटील यांच्या समर्थकांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, याकडे सर्वांचं लक्ष राहील.

दरम्यान, नगरमध्ये लंके (Nilesh Lanke) यांच्या विजयावर सुजय विखे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. अशात आता लंके समर्थकांनी लावलेल्या या बॅनरची चर्चा रंगली आहे.

News Title – Nilesh Lanke supporters target sujay vikhe by banner

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट

पेन्शन संदर्भात सरकारने ‘हा’ नियम बदलला; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा

“खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे?”, शरद पवारांनी अर्थसंकल्पाचा हिशोब काढला

पुण्यासह नगरच्या काही भागांवर रात्री ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण