इंग्रजी भाषेतून शपथविधी म्हणजे विखेंना प्रत्युत्तर?, निलेश लंके म्हणाले…

Nilesh Lanke | निलेश लंके (Nilesh Lanke) हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके विरूद्ध भाजपचे नेते सुजय विखे यांच्यात लढत झाली. ही लढत अनेक कारणाने चर्चेचा विषय ठरली होती. या लढतीत निलेश लंकेंना (Nilesh Lanke) इंग्रजी भाषेवरून अनेकदा डिवचण्यात आलं. अशातच निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) संसदेत इंग्रजीतून भाषण केलं आहे.

संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. हे खासदार आता आपल्या मतदारसंघाचा आवाज होतील. त्याची आज सुरूवात झाली आहे. अनेक खासदारांनी दिल्लीतील संसद भवनामध्ये  मराठी भाषेतून शपथ घेतली. तसेच यामध्ये निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसते.

निलेश लंकेंचा इंग्रजीतून शपथविधी सुजय विखेंना प्रत्युत्तर होतं का?

निलेश लंकेंनी घेतलेली शपथ म्हणजे सुजय विखेंना प्रत्युत्तर होतं का?, असा सवाल लंकेंना विचारण्यात आला होता. त्यावर आता निलेश लंकेंनी उत्तर दिलं की, मी खासदार झाल्यानंतरच इंग्रजीतून शपथ घ्यायची असं ठरवलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलत असताना विचारलं. इंग्रजीतून शपथ घेणं म्हणजे सुजय विखेंना प्रत्युत्तर आहे का? त्यावर निलेश लंकेंनी विरोधकांना हे प्रत्युत्तर नसल्याचं उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?

अजित पवार गटाचा मेळावा होता. त्या मेळाव्यात भाजपचे नेते सुजय विखे यांनी संसदेत भाषण करतानाचा एक व्हिडीओ लावला. त्यावेळी ते म्हणाले की, समोरच्या उमेदवारानं जरीही एक महिना भाषण पाठ केलं आणि असं इंग्रजीत बोलून दाखवलं तरीही मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरूद्ध सुजय विखे यांच्यात लढत झाली. या लढतीत निलेश लंके विजयी झाले. भाजप आणि विखेंचा बालेकिल्ल्याला शरद पवारांच्या पैलवानाने चितपट करत विखेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. ते विजयी होऊन त्यांनी आज इंग्रजीतून शपथ घेत ‘हम भी किसीसे कम नही’,  असं दाखवून दिलं आहे.

News Title – Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil About Shapath Vidhi In Sansad

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस होणार; ऑरेंज अलर्ट जारी

सामान्य माणसाने खायचं तरी काय?; भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला

खासदार झाल्यानंतर कंगना रनौतने केली सर्वात मोठी घोषणा!

“तुला जिवंत राहायचं की नाही?”; नवनाथ वाघमारेंना जीवे मारण्याची धमकी

पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!