‘या’ बड्या नेत्याच्या उपस्थितीत निलंगेकर उमेदवारी अर्ज भरणार

On: October 28, 2024 6:28 PM
Nilanga Vidhansabha
---Advertisement---

Nilanga Vidhansabha l महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. अशातच भाजपने निलंगा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता निलंगेकर हे उद्या (दि.29) हजारो नागरिकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

निलंगेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार :

निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपचे जेष्ठ नेते विनोद तावडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आशीर्वाद सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक सभेसाठी तीनही तालुक्यातील भजनी मंडळे, गणेश मंडळे, आराधी मंडळे, वारकरी व दुर्गा मंडळे तसेच नागरिक आणि मतदारांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Nilanga Vidhansabha l निलंग्याचा विकास करण्यासाठी ही विधानसभा महत्त्वाची :

विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निलंगेकर यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून नागरिकांचा प्रत्यक्ष आशीर्वाद देखील घेतला आहे. याशिवाय त्यांनी विविध गावात जन आशीर्वाद सभा, नागरिक व मतदार मेळावे, महिला मेळावे, बचत गटांच्या महिलांचे मेळावे, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवादाचे कार्यक्रम ,व्यापारी,वकील तसेच विविध समाज घटकांसोबत बैठका घेतल्या आहेत.

याशिवाय मागील काळात राबविलेल्या विविध विकासकामांची लोकार्पणे व मंजूर झालेल्या योजनांची भूमिपूजने देखील झाली आहेत. अशातच आता विकास कामांची गती कायम राखत निलंगा मतदार संघाला नव्या उंचीवर पोहचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मात्र आता निलंगा विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तसेच यासंदर्भात उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या आशीर्वादानेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. जनतेने आजपर्यंत अपार प्रेम केले आहे. प्रत्येक कार्यात साथ दिली आहे. यावेळी ही पुन्हा एकदा आपली साथ आणि सहकार्य तसेच आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत आपण जो विश्वास दाखवला त्या बळावरच ही वाटचाल सुरू असून मंगळवारी होणाऱ्या आशीर्वाद सभेस आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

News Title – Avadhoot Gupte Statement On Sambhajirao Patil Nilangekar

महत्त्वाच्या बातम्या-

निलंगेकर यांना पाठबळ देण्याची गरज; अवधूत गुप्ते

भाजपने बूथ प्रमुखांच्या बळावर निवडणुका जिंकल्या- संभाजी पाटील निलंगेकर

भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची नावे जाहीर

मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव

भोसरीत भाजपच्या लांडगेंचा टांगा पलटी होणार, लांडे घोडे फरार करणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now