प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्यांचा गराडा; धक्काबुक्कीत अक्षरश: अशी झाली अवस्था, व्हिडीओ व्हायरल

On: December 18, 2025 5:20 PM
Nidhhi Agerwal
---Advertisement---

Nidhhi Agerwal | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबत हैदराबादमध्ये घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका चित्रपटाच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना चाहत्यांच्या मोठ्या घोळक्याने तिला वेढले, ज्यामुळे तिची अक्षरशः कोंडी झाली. या गर्दीत तिच्यासोबत धक्काबुक्कीही झाली असून, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

‘बाहुबली’ फेम प्रभासच्या आगामी ‘द राजा साहब’ चित्रपटातील ‘सहना सहना’ या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमासाठी निधी अग्रवाल उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना अचानक चाहत्यांची मोठी गर्दी तिच्याभोवती जमली. सुरक्षेअभावी ती त्या गर्दीत अडकली आणि कसंबसं स्वतःला सावरत गाडीपर्यंत पोहोचली. (Nidhhi Agerwal)

गर्दीत अडकलेली निधी, चेहऱ्यावर भीती स्पष्ट :

व्हायरल व्हिडीओमध्ये निधी अग्रवाल चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. स्वतःचे कपडे सांभाळत, तोल जात असतानाही ती पुढे सरकत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, अस्वस्थता आणि संकोच स्पष्टपणे दिसून येतो. काही क्षणांसाठी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत असून, अभिनेत्रीला कोणतीही प्रभावी सुरक्षा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे.

गाडीपर्यंत पोहोचताच निधीने सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, तोपर्यंत तिला जो मानसिक ताण सहन करावा लागला, तो व्हिडीओतून स्पष्ट जाणवतो. या घटनेने सेलिब्रिटी सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Nidhhi Agerwal | व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह :

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “चाहत्यांनी मर्यादा ओलांडू नयेत, हे वागणं अत्यंत अस्वीकार्य आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तर “इतक्या मोठ्या कार्यक्रमात अभिनेत्रीच्या सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नाही का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. (Nidhhi Agerwal Viral Video)

चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आयोजकांनी योग्य नियोजन का केलं नाही, अभिनेत्रीला सुरक्षितपणे गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी का नव्हते, असे प्रश्न नेटकरी सातत्याने विचारत आहेत. अनेकांनी या घटनेला लज्जास्पद आणि अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे.

निधी अग्रवालने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आयस्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’ आणि ‘हरि हारा वीरा मल्लु’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मारूती दिग्दर्शित ‘द राजा साहब’ हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, या घटनेमुळे चित्रपटाच्या चर्चेला वेगळाच वळण मिळाले आहे.

News Title : Nidhhi Agerwal Faces Shocking Crowd Push at Event, Viral Video Sparks Outrage Over Celebrity Security

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now