काव्या मारनची रडण्यासारखी हालत कोणी केली? वाचा सविस्तर

On: March 28, 2025 9:42 AM
Kavya Maran
---Advertisement---

Kavya Maran l IPL 2025 स्पर्धेतील सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याने चाहत्यांमध्ये मोठीच चर्चा निर्माण केली आहे. कारण या सामन्यात SRH संघाच्या मालक काव्या मारन यांची अवस्था इतकी निराशाजनक झाली की, तिचे चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती रडेल की काय, असाच प्रश्न उपस्थितांना पडला. यामागे कारण ठरला एक खेळाडू – निकोलस पूरन.

ज्याला धुडकावलं, त्याच्याकडूनच पराभव :

सनरायजर्स हैदराबादने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 धावांचा डोंगर उभारला होता. काव्या मारनला विश्वास होता की, तिचे गोलंदाज हे लक्ष सहजपणे वाचवतील. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सने हे लक्ष्य केवळ 16.1 षटकांमध्ये पार केलं. या विजयाचे सर्वात मोठं श्रेय गेलं ते निकोलस पूरनच्या तुफानी खेळीला.

निकोलस पूरनने केवळ 26 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी करत SRH संघाचा पराभव निश्चित केला. विशेष बाब म्हणजे, हाच निकोलस पूरन कधी काळी सनरायजर्स हैदराबादचा भाग होता. 2022 साली काव्या मारनने त्याला तब्बल 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र, पुढच्या वर्षीच SRH ने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.

Kavya Maran l अप्रतिम पुनरागमन आणि SRH विरुद्ध बदला :

पूरनला SRH ने बाजूला केल्यानंतर LSG ने त्याच्यावर विश्वास दाखवला. आणि यंदाच्या हंगामात तो विश्वास सार्थ ठरवत निकोलस पूरनने माजी संघाविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. त्याच्या खेळीनं केवळ सामना फिरवला नाही तर काव्या मारनसारख्या मालकांनाही खिन्न केलं.

स्टेडियममधून काव्या मारनचे चेहरे निराश, उदास, हताश अशा विविध भावनांमध्ये टिपले गेले. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अनेकांनी “पूरनचा बदला” असं कॅप्शन देत या घटनेची खिल्ली उडवली आहे.

निकोलस पूरनची घसघशीत कामगिरी :

पूरनने फक्त SRH च्या गोलंदाजांची धुलाई केली नाही, तर त्याने आपल्या स्ट्राइक रेटनं सर्वांनाच थक्क केलं. 269 च्या स्ट्राइक रेटने केलेल्या 70 धावा आणि त्यात झळकवलेले चौकार-षटकार म्हणजे अक्षरशः एकतर्फी खेळी. SRH ने ज्या खेळाडूला डावललं, त्याच खेळाडूने संपूर्ण सामन्याचं पारडं फिरवलं.

SRH च्या या पराभवाने त्यांच्या चाहत्यांमध्येही नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “जो खेळाडू संघासाठी मोलाची कामगिरी करू शकतो, त्यालाच का सोडलं?” काहींनी काव्या मारनच्या निर्णय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

News Title: Nicholas Pooran Takes Revenge on SRH, Kavya Maran’s Heartbreaking Reaction Goes Viral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now