Number Plate | महाराष्ट्रामध्ये, केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (High Security Registration Plate) (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवण्यासाठी पुणे (Pune) शहरात ६९ केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Number Plate)
एचएसआरपी (HSRP) प्लेट का आवश्यक आहे?
‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’ने (Central Ministry of Road Transport and Highways) २०१८ मध्ये आदेश देऊन, १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना ‘एचएसआरपी’ देणे बंधनकारक केले होते. जुन्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला होता. त्यानुसार, अनेक राज्यांनी ‘एचएसआरपी’ बंधनकारक केले; परंतु महाराष्ट्रात (Maharashtra) जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक नव्हते.
या नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी बनवल्या जातात. या प्लेटवर होलोग्राम (Hologram) स्टिकर असते, तसेच इंजिन आणि चेसिस क्रमांक (Chassis Number) नमूद केलेला असतो. हा क्रमांक प्रेशर मशीनने (Pressure Machine) लिहिलेला असतो. एकदा ही प्लेट तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही. कुणीही तिची नक्कल करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनाची चोरी झाल्यास किंवा गैरवापर झाल्यास, गाडी मालकाची सर्व माहिती मिळते.
नोंदणी आणि अंमलबजावणी
राज्य परिवहन विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे. यासाठी ‘रोझमर्ता सेफ्टी सिस्टीम लि.’ (Rosemerta Safety System Pvt. Ltd.) या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. स्वप्नील भोसले (Swapnil Bhosale), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी सांगितले की, “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिकृत सेंटरवरूनच बसवून घ्यावी. मदतीसाठी ७४३६८८८८२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.”
पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आरटीओसाठी (RTO) या कंपनीला हे काम देण्यात आले असून, या लिंकवर https://mhhsrp.com ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. या सुविधेसाठी दुचाकी, ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर चारचाकी आणि अन्य वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. (Number Plate)
Title : New Number Plate Mandatory Deadline March 31






