Kawasaki Versys 110 Launch l कावासाकी वर्सेस 110 (Kawasaki Versys 110) चे नवीन मॉडेल भारतीय बाजारात दाखल झाले आहे. ही बाईक 12.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने बाईकच्या इंजिनची क्षमता थोडी वाढवली आहे.
किंमत आणि उपलब्धता :
अपडेटनंतरही (Update), कंपनीने या मोटरसायकलची किंमत कमी केली आहे. Kawasaki Versys 110 ची किंमत मागील मॉडेलपेक्षा 1 लाख रुपयांनी कमी आहे.
कावासाकी (Kawasaki) वर्सेस 110 (Versys 110) जागतिक बाजारात बेस ट्रिम (Base Trim), एस (S) आणि एसई (SE) अशा तीन व्हेरिएंटमध्ये (variant) येते. पण भारतात फक्त स्टँडर्ड व्हर्जन (Standard Version) उपलब्ध आहे. या दुचाकीमध्ये रंगाचा कोणताही पर्याय नाही. ही बाईक मेटॅलिक डायब्लो ब्लॅक (Metallic Diablo Black) आणि मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे (Metallic Matt Graphene Steel Grey) रंगात येते. इंजिन क्षमता वाढवण्याव्यतिरिक्त, कावासाकीने (Kawasaki) तिच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत.
Kawasaki Versys 110 Launch l इंजिन आणि पॉवर :
कावासाकीचे (Kawasaki) हे नवीन मॉडेल 1099 cc, लिक्विड-कूल्ड, इनलाइन 4-सिलेंडर, DOHC इंजिनसह (Engine) येते. इंजिन क्षमतेत वाढ झाल्यामुळे, बाईकची शक्ती वाढली आहे. 9,000 आरपीएमवर (rpm) 118 bhp पॉवर निर्माण करणारे इंजिन आता 133 bhp पॉवर निर्माण करते. हे इंजिन 7,600 rpm वर 112 Nm टॉर्क (Torque) निर्माण करते. या मोटरसायकलच्या इंजिनला 6-स्पीड रिटर्न शिफ्ट ट्रान्समिशन (Transmission) देखील जोडलेले आहे. बाईकमध्ये 21 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
या कावासाकी (Kawasaki) बाईकमध्ये सर्वत्र एलईडी लाईट्स (LED Lights) आहेत. तसेच, ॲडजस्टेबल विंडस्क्रीन (Adjustable Windscreen) आहे. बाईकच्या हँडलबारला (Handlebar) एक USB टाइप-सी सॉकेट (USB Type-C Socket) जोडलेला आहे. या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल (Electronic Cruise Control) आणि ट्रिपल मोड ट्रॅक्शन कंट्रोलची (Triple Mode Traction Control) सुविधा देखील आहे.






