मुंबई प्रवाशांसाठी गुड न्यूज! साकेत-आमणे एलिव्हेटेड रोड सुरु

On: February 20, 2026 6:24 PM
Saket Amne Elevated Road
---Advertisement---

Saket Amne Elevated Road | नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी दक्षिण मुंबईत जलद पोहोचण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने आमणे ते साकेतदरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि प्रवास अधिक सुलभ करण्यास मदत होणार आहे.

२१.३ किमी उन्नत मार्गाला मंजुरी :

पूर्वी सुमारे १८ किलोमीटरचा मार्ग उभारण्याची योजना होती; मात्र आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority – MMRDA) मार्फत आमणे ते साकेतदरम्यान २१.३ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६,२०२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून खर्चालाही हिरवा कंदील मिळाला आहे.

या नव्या उन्नत मार्गामुळे समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना आमणेपासून थेट दक्षिण मुंबईकडे जाता येईल. सध्या वाहतूक कोंडीमुळे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत असला, तरी हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे एका तासावर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इंधन बचत आणि वेळेची बचत दोन्ही साध्य होणार आहेत.

Saket Amne Elevated Road | दक्षिण मुंबईत थेट कनेक्टिव्हिटी :

या प्रकल्पाची अंमलबजावणी MMRDA करणार असून पुढील काळात मार्गाची देखभाल आणि संचालन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Maharashtra State Road Development Corporation – MSRDC) कडे सोपवण्याची शक्यता आहे. मार्गाची सुरुवात आमणे येथे होईल आणि तो साकेतपर्यंत जाईल. पुढे साकेत-आनंदनगर मार्ग, छेडानगर उड्डाणपूल, पूर्व मुक्त मार्ग, तसेच ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह दुहेरी बोगद्याच्या माध्यमातून वाहनांना मरिन ड्राइव्हपर्यंत पोहोचता येणार आहे.

याशिवाय भविष्यात विरार, भाईंदर आणि अलिबाग या दिशेने जाणाऱ्या मार्गांशी तसेच ठाणे खाडी किनारा मार्गाशी जोडणी करण्यात येणार आहे. या उन्नत मार्गात सहा इंटरचेंजचा समावेश असेल, ज्यामुळे खारेगाव, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आणि विद्यमान सागरी सेतू तसेच सागरी किनारा मार्गांचा सहज वापर करता येईल. एकूणच, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडला जाणारा हा प्रकल्प भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करत दक्षिण मुंबईत जलद आणि सुरळीत प्रवेश देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

News title : New Elevated Link to South Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now