New change | ऑक्टोबर महिना सुरू व्हायला आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत. येणाऱ्या 1 ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल होऊ शकतात. आयकर, आधार कार्ड ते एलपीजी गॅस किंमतीपर्यंत अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (New change)
अर्थसंकल्प 2024 मध्ये देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकरबाबत काही महत्वाच्या बदलांची घोषणा केली होती. त्यातील काही बदल हे लागू झाले आहेत. तर, काही बदल हे 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
यामध्ये Direct Tax Vivad to Vishwas Scheme 2024 ही योजना देखील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे. ही योजना करासंबंधीत सर्व प्रलंबित वादावर तोडगा काढण्यासाठी आणली आहे. ज्या करदात्यांची आणि संस्थांची उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात कर, व्याज आणि दंडासंबंधी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांना त्यावर तोडगा काढण्यासाठी ही एक चांगली योजना ठरू शकते.
आधारसंबंधी काय बदल होणार?
अर्थसंकल्प 2024 मध्ये आधार संख्येऐवजी आधार नामांकन आयडीचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यासंबंधीची तरतूद बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पॅन कार्डसाठी कोणालाही अर्जात आयकर रिटर्नमध्ये आधार कार्डचा उल्लेख करण्याची गरज नसेल. याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होईल. (New change)
गॅस दरवाढ होणार की दिलासा मिळणार?
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल होताना दिसून येतो.ऑगस्टमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस महागला होता. सप्टेंबरमध्ये देखील त्यात दरवाढ झाली होती. आता 1 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा दरवाढ होणार काय?, याबाबत सर्वांचं लक्ष असेल. (New change)
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
गेल्या 6 महिन्यांपासून इंधनदरात कोणतेच बदल झाले नाहीत. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (New change)
News Title – New change from 1 October 2024
महत्वाच्या बातम्या-
‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट
लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर
सोने आणि चांदीने उडवली ग्राहकांची झोप; जाणून घ्या आजचा दर
कुंभसह ‘या’ राशींना आज मिळणार शुभवार्ता, वाचा राशीभविष्य!
सोनं-चांदी सुसाट, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे भाव






