पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल

Share Market IPO l सध्या शेअर मार्केटमध्ये दररोज नवनवीन कंपन्या दाखल होत आहेत. या कंपन्या शेअर मार्केटमध्ये दाखल होताच आपल्या गुंतवणूकदारांना देखील चांगले रिटर्न्स देत आहेत. काही कंपन्या तर वर्षभराच्या काळात थेट मल्टिबॅगर ठरत आहेत. दरम्यान, अशातच आता आणखी एक कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. त्याआधी या कंपनीने आपला आयपीओ (IPO) शेअर बाजारात आणला असून जास्तीत जास्त लोकांना यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे.

28 जूनला IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार :

किडनी केयर सर्विस प्रोवाइडर नेफ्रो केयर इंडिया लिमिटेडने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, IPO 28 जून रोजी उघडणार आहे तर 2 जुलै रोजी बंद बंद होणार आहे. यासाठी 85-90 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आली आहे.

अँकर गुंतवणूकदार 27 जून रोजी गुंतवणूक करू शकतात. IPO मध्ये 41.26 कोटी रुपयांचे 45.84 लाख शेअर जारी केले जाणार आहेत. यानंतर कंपनीचे शेअर्स NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जातील. कंपनीला IPO मधून उभारलेले 26.17 कोटी रुपये मध्यग्राम, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे व्हिव्हॅसिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी वापरायचे आहेत. उर्वरित भांडवल सामान्य कॉर्पोरेट ऑपरेशन्ससाठी वापरले जाणार आहे.

Share Market IPO l कमीत कमी किती रुपये गुंतवणूक करावे लागणार? :

IPO चे लॉट साइज 1600 शेअर्स आहे. एका लॉटसाठी 1,44,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे. 35% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. सुमारे 6.19 लाख शेअर्स एचएनआयना वाटप केले जातील, तर 8.25 लाख शेअर्स QIB आणि 14.45 लाख शेअर किरकोळ गुंतवणूकदारांना दिले जातील.

तसेच 2.25 लाख शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी आणि 2.23 लाख शेअर्स मार्केट मेकर्ससाठी राखीव आहेत. त्यामुळे या IPO मध्ये 2 जुलै 2024 रोजीपर्यंत तुम्हाला या पैसे गुंतवता येऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या आयपीओचा किंमत पट्टा हा तब्बल 85-90 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे.

News Title – Nephro Care IPO Launch

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवणार

“तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळला नाही…”, निलेश राणेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

इंग्रजी भाषेतून शपथविधी म्हणजे विखेंना प्रत्युत्तर?, निलेश लंके म्हणाले…

पुण्यात हिट अँड रन प्रकार सुरूच, ससूनच्या डॉक्टरने तिघांना चिरडले

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस होणार; ऑरेंज अलर्ट जारी