NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!

On: January 17, 2025 10:14 AM
10th Board Exam
---Advertisement---

NEET l वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (Medical Courses) प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा- पदवी (NEET-UG) आता पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच पेपर आणि पेनाच्या (Paper-Pen) साहाय्यानेच होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली.

ही परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन (Online) पद्धतीने घ्यावी, यावर सरकारने गांभीर्याने विचार केला, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency – NTA) दिली आहे. एनटीएने (NTA) सांगितले की, “नीट-यूजी परीक्षा एकाच दिवशी व एकाच सत्रात पेपर आणि पेनाच्या साहाय्याने घेतली जाईल, असा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.” २०२४ मध्ये, जवळपास २४ लाख विद्यार्थी नीट-यूजी परीक्षेला बसले होते.

सीबीएसई (CBSE) आणि एनटीए (NTA) कारवाईकडे लक्ष :

नीट-यूजी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा- प्राध्यापक (UGC-NET) या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप असून, या प्रकरणांची सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी सुरू आहे. या चौकशीत काय कारवाई होते, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांसाठी दिलासा :

हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक अडचणी आणि गैरप्रकारांची शक्यता लक्षात घेता, ऑफलाईन परीक्षा घेणे हाच योग्य पर्याय असल्याचे मत अनेक विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केले होते.

News Title: NEET-UG to be Conducted Offline with Paper and Pen

महत्वाच्या बातम्या-

एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल?, आढळराव पाटलांच्या आरोपांनी खळबळ

‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार आठवा वेतन आयोग, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अजित पवारांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का, पार्थ पवारांना स्थान मात्र मुंडेंना वगळले!

आजचे राशिभविष्य: स्वामींची कृपा होणार, या राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now