मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

NEET PG 2024 Exam | देशभरात नीट परीक्षेबाबत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक थेट रस्त्यावर उतरले होते. काही राजकीय नेत्यांनी देखील हा मुद्दा लावून धरला होता. परीक्षेतील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

नीट परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहोचले. इतकंच नाही तर, अनेक ठिकाणी पेपर फुटल्याचाही दावा करण्यात आला. त्यानंतर ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 23 जून 2024 रोजी परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही तारिख नंतर रद्द करण्यात आली.

NEET PG 2024 परीक्षेची नवी तारिख जाहीर

त्यानंतर विद्यार्थी नव्या तारखेची वाट बघत होते. आता नवीन तारीख ही जाहीर करण्यात आलीये. नीटची परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका ही तीन तास अगोदर तयार होणार आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG 2024 परीक्षेची डेटशीट जारी केली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. परीक्षेच्या नवीन तारखेसह नीट पीजी 2024 परीक्षेसाठी प्रवेशपत्र पुन्हा जारी करण्याची शक्यता आहे.

11 ऑगस्टरोजी देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा होणार

परीक्षेच्या आधी एक आठवडा हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहेत. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. परिक्षेसंदर्भातील अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर पाहता येणार (NEET PG 2024 Exam) आहे.

News Title –  NEET PG 2024 Exam New Date Announced

महत्त्वाच्या बातम्या-

“माझा वापर केला, माझी इज्जत..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढील दोन दिवस..

आज ‘या’ 4 राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल!