Neeraj Chopra Final l भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा आज इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव करण्याचा प्रयत्न करणार आहे. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास भालाफेकचे विजेतेपद राखणारा तो ऑलिम्पिक इतिहासातील पाचवा खेळाडू ठरेल. यासह वैयक्तिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
फायनल कधी आणि कुठे होणार? :
नीरज चोप्राने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर फेक करून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो आणि कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम थ्रो ठरला आहे. तसेच नीरज चोप्राचा भालाफेकचा अंतिम सामना आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार नीरज चोप्राची फायनल आज रात्री 11:55 वाजता सुरू होणार आहे.
पाकिस्तानचा अर्शद नदीमही नीरज चोप्राचा प्रतिस्पर्धी आहे. पण, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच असे भालाफेक करणारे आहेत जे नीरजसाठी मोठा धोका बनू शकतात.
Neeraj Chopra Final l सामना लाइव्ह कुठे बघायचा? :
Sports18 चॅनेल : तुम्ही सामना Sports18 1 आणि Sports18 1 HD चॅनेलवर इंग्रजीमध्ये पाहू शकता. याशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही तो प्रसारित होणार आहे. स्पोर्ट्स18 खेल आणि स्पोर्ट्स18 2 वर हिंदीमध्ये प्रसारित केले जाईल.
डीडी स्पोर्ट्स : या फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर देखील होणार आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग : याशिवाय तुम्ही JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
News Title : Neeraj Chopra Final Live Streaming
महत्त्वाच्या बातम्या-
बाजारात आलाय सर्वात बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का!
उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?, थेट दिल्लीतून मोठी बातमी
विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..
मोठी बातमी! ”या’ योजनेअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार ‘इतके’ रुपये






