शरद पवारांचा जलवा; 10 पैकी 10 जागांवर जोरदार मुसंडी

NCP Sharad Pawar Lok Sabha Election | राज्यातील 48 जागांसाठीचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. यामध्ये शरद पवारांनी जोरदार मुसंडी घेतल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर दिग्गज नेत्यांनी अजित पवारांची साथ धरली होती. यानंतरही शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. शरद पवारांचे 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये 10 जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.

शरद पवार गटाची आघाडी

यामध्ये शिरूर मतदारसंघ अधिक चर्चेत आहे. इथे अमोल कोल्हे अगदी पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत.पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन कोल्हे 25088 मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये देखील बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. येथे भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.

तर, साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा फटका इथे बसला आहे. यासोबतच सर्वाधिक चर्चेत राहिलेला माढा मतदारसंघ येथेही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीचा महायुतीला धक्का

दिंडोरी, माढा. रावेर, भिवंडी , वर्धा, अहमदनगर दक्षिण या जागांवर (NCP Sharad Pawar Lok Sabha Election) शरद पवार गटाने जोरदार आघाडी घेतली आहे. राज्यातील 48 जागांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरेंचे 8, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत.

News Title :  NCP Sharad Pawar Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!

अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?

लोकसभा निकालाच्या भीतीने शेअर मार्केटमध्ये मोठे बदल; पुढे काय होणार?

महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर

साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट