शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणाचा ‘तो’ लेख आणि सुनील तटकरेंनी दिलं जशास तसं उत्तर! वाचा सविस्तर

On: February 13, 2026 5:14 PM
Sunil Tatkare
---Advertisement---

Sunil Tatkare | राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी पक्षाच्या साप्ताहिकातील लेखातून मोठे दावे केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेंचा लेख आणि विलीनीकरणाचा दावा :

पक्षाच्या अधिकृत साप्ताहिकामध्ये लिहिलेल्या लेखात शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. त्यांनी असा दावा केला की, एकत्रीकरणानंतर पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्या हाती देण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही कारणांमुळे ते स्वप्न साकार होऊ शकले नाही. आता ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आहे, असे त्यांनी नमूद केले.

तसेच एका अदृश्य शक्तीच्या हस्तक्षेपामुळे अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतंत्र गट उभारावा लागला, असा उल्लेखही त्यांनी केला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून परिस्थिती सुधारून चूक दुरुस्त करण्याच्या उद्देशाने अजित पवार प्रयत्नशील होते, असा मोठा दावा शिंदे यांनी आपल्या लेखातून केला आहे.

Sunil Tatkare | तटकरेंचा प्रतिवाद आणि इशारा :

शिंदे यांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी त्यांचे विधान ठामपणे फेटाळले. अशा संवेदनशील विषयावर सार्वजनिकरीत्या असे विधान करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांची भारतीय जनता पक्षासोबत (Bharatiya Janata Party) जाण्याची भूमिका अनेक वर्षांपासूनची असल्याचे सांगत त्यांनी २०१४, २०१६ आणि २०१९ या कालखंडांचा उल्लेख केला. त्या वेळी चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचल्या होत्या, तसेच २०१९ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थिर राहू शकते व केंद्राची मदत मिळू शकते, असे मत अजित पवार यांनी मांडले होते, असे तटकरे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मासिक दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होते. यावेळी ते १२ तारखेलाच का आले, हा योगायोग आहे की मुद्दाम तसे केले गेले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शिंदे जर अजित पवारांनी वैतागून किंवा विशिष्ट कारणांमुळे निर्णय घेतल्याचे सुचवत असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) त्याला योग्य उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच विलीनीकरणाबाबत समोरून अधिकृत प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करण्याची तयारी असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

News title : NCP Merger Row Sparks Reaction

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now