अजितदादा गटातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक शरद पवार गटात जाणार; यादी आली समोर

On: July 17, 2024 12:25 PM
Rekha Chandrakant Tingre
---Advertisement---

NCP Ajit Pawar | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, तसेच इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि भोसरीचे माजी आमदार विकास लांडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच अजित गव्हाणे हे देखील आज शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. (NCP Ajit Pawar)

अजित पवार गटातील पदाधिकारी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार

मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश करणारे वसंत मोरे यांनी काही दिवसांआधी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत वसंत मोरेंचे काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. (NCP Ajit Pawar)

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथे अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक मुख्यपदाधिकारी देखील आज पक्षप्रवेश करणार आहे.

अजित गव्हाणे, पंकज भालेकर, राहुल भोसले, दिवंगत दत्ता साने यांचे पुत्र यश साने, विनया तापकीर, संगीता ताम्हणे, घनश्याम खेडेकर, महापौर हनमंतराव भोसले, वैशालीताई घोडेकर माजी महापौर, नगरसेवक प्रवीण भालेकर, रवी आप्पा सोनवणे, संजय नेवाळे, विजयाताई तापकीर, समीर मासुळकर, गीताताई मंचरकर, संजय वाबळे, वैशालीताई उबाळे, सौ शुभांगी ताई बोराडे, सौ विनया ताई तापकीर, नगरसेविका अनुराधा गोफने इतर अनेक काही नगरसेवक हे शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. (NCP Ajit Pawar)

पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग

यावर आता शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे. ते काही कारणास्तव तिकडे गेले होते. पण शहराध्यक्ष या नात्याने मी सर्वांचा सन्मान करतो असं तुषार कामठे म्हणाले आहेत.  (NCP Ajit Pawar)

“अजित पवारांवर राज्यात नाराजी आहे. त्यामुळे अनेकजण शरद पवार गटात प्रवेश करतील. पिंपरी चिंचवडमधील 10 नगरसेवकही आमच्या गटात पक्षप्रवेश करतील. पिंपरी चिंचवड या ठिकाणी पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते काही कारणास्तव तिकडे गेले होते. पण शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांचा सन्मान करतो”, असं शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले.

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षेपेक्षा म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. म्हणून महायुतीतील नेते हे शरद पवार गटात  पक्षप्रवेश करत असल्याचं दिसतंय.

News Title – NCP Ajit Pawar Leaders Will Enter In NCP Sharad Pawar Group

महत्त्वाच्या बातम्या

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद

प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…

IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार दिसल्या शरद पवारांच्या मोदीबागेत

Join WhatsApp Group

Join Now