“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज

On: December 9, 2024 11:00 AM
Navneet Rana Challenge to MP Balwant Wankhede
---Advertisement---

Navneet Rana | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झालाय. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही मतदानात गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. अशात अमरावतीत सध्या राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आंदोलन पुकारले आहे. यावरच भाजपच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मविआ नेत्यांना आव्हान दिलं आहे.

मविआ नेत्यानी लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला नाही. मात्र आता ते उगाच आरोप करीत सुटले आहेत. त्‍यांना जर इव्‍हीएमवर शंका असेल, तर अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मविआला दिलं आहे.

नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?

लोकसभेत यांना यश मिळालं तेव्हा त्यांनी इव्‍हीएमवर शंका उपस्थित केली नाही. त्‍यावेळी इव्‍हीएम बरोबर होते. तेव्‍हा लोकशाही जिवंत होती, असा टोला देखील नवनीत राणा यांनी लगावला. सध्या नवनीत राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना दिलेल्या आव्हानाची चर्चा सुरू आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी राजीनामा द्या, मग रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या. त्यांचे हे आव्हान खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं असून त्यांनी प्रतिआव्हानही दिलं आहे.

बळवंत वानखेडे यांचं प्रतिआव्हान

“भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा यांनी आव्हान दिलं आहे की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेटपेपरवर निवडणूक लढवाव्यात. निवडणूक आयोगाकडून त्यांनी मला लेखी पत्र द्यावं. येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेटपेपरवर होईल, असं या लेखी पत्रात असावं. मी कधीही राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त एकच अट आहे की निवडणूक आयोगाकडू बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊ असं पत्र त्यांनी द्यावं.”, असं प्रतिआव्हान बळवंत वानखेडे यांनी दिलं आहे. आता नवनीत राणा (Navneet Rana) हे आव्हान स्वीकारणार का?, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.

News Title : Navneet Rana Challenge to MP Balwant Wankhede

महत्वाच्या बातम्या –

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार, IMD कडून अलर्ट

मोठी बातमी! लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 7000 रुपये, काय आहे नवी योजना?

“मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर ठरवा, आधी…”; ‘या’ बड्या नेत्याची महायुतीकडे मोठी मागणी

आज दुर्गाष्टमीला देवी दुर्गा ‘या’ राशींना देणार सुख-समृद्धी, धनलाभाचे देखील संकेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

Join WhatsApp Group

Join Now