Toll Tax Hike l लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच 4 जूनला जाहीर होणार आहे. अशातच निकालापूर्वीच देशातील जनसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने महामार्गावरील प्रवास आता महाग केला आहे. त्यामुळे आता प्रवास करणे देखील महाग झाले आहे.
टोल टॅक्स का वाढवला?
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आजपासून अनेक टोल प्लाझांवर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आता प्रवास करताना 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सर्व द्रुतगती मार्गावरील टोल करात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. हा नवा टोल टॅक्स सोमवार, 3 जूनपासून लागू होणार आहे. घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीच्या बदलानुसार NHAI दरवर्षी टोल टॅक्समध्ये बदल करते.
Toll Tax Hike l लोकसभा निवडणुकीमुळे निर्णय पुढे ढकलला :
NHAI ने 1 एप्रिलपासून दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील टोल शुल्कात 5 ते 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आता ही मंजुरी मिळाली आहे. सध्या या एक्स्प्रेस वेवर टोल शुल्क प्रति किलोमीटर 2.19 रुपये आहे. हा बदल 1 एप्रिलला होणार होता, पण लोकसभा निवडणुकीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. देशात जवळपास 855 टोल प्लाझा आहेत जिथे टोल टॅक्स वसूल केला जातो. यापैकी सुमारे 675 सार्वजनिक अनुदानित प्लाझा आहेत आणि 180 सवलतीधारकांकडून चालवले जातात.
यापूर्वी, 2022 मध्ये टोल टॅक्स मर्यादा 10 ते 15 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती, राष्ट्रीय महामार्गांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या कारसाठी टॅरिफ शुल्क 10 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आले होते. या नव्या टोल टॅक्सचा परिणाम सर्व एक्सप्रेसवे वापरकर्त्यांना होणार आहे. आता एक्स्प्रेस वेवर प्रवास करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
News Title – National Highways Toll Hike
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ
आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल
‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ






