‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा; असं बुक करा तिकीट

On: September 18, 2024 3:29 PM
National Cinema Day Offer
---Advertisement---

National Cinema Day Offer l जर तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कोणत्याही चित्रपटाचे तिकीट 99 रुपयांना खरेदी करू शकता. आजकाल पीव्हीआर असो किंवा सिनेपोलिस तुम्हाला चित्रपटाचे तिकीट 300-400 रुपयांमध्ये उपलब्ध होते. परंतु या ऑफर अंतर्गत फक्त तुम्हाला 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

या दिवशी पाहता येणार 99 रुपयात चित्रपट :

20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. या दिवशी जवळपास सर्वच थिएटर्स त्यांच्या ग्राहकांना तिकीट बुकिंगवर ही ऑफर देणार आहेत. 99 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे बुक करण्यासाठी तुम्ही BOOKMYSHOW, PVR Cinemas, Paytm, INOX, CINEPOLIS, CARNIVAL ऑनलाइन वापरू शकता.

सर्वात महत्वाचं म्हणजे ही ऑफर PVR, INOX, CINEPOLIS, CARNIVAL, MIRAJ, CITY PRIDE, ASIAN, MUKTA A2, MOVIE TIME, WAVE, M2K, DELITE आणि इतर अनेक चित्रपटगृहांच्या स्क्रीनवर उपलब्ध असू शकते.

National Cinema Day Offer l ऑफर कशी मिळवायची? :

सर्वप्रथम तुम्हाला वरती दिलेल्या ॲपवर जाऊन तुमचे लोकेशन सिलेक्ट करावे लागेल. यानंतर चित्रपट निवडा आणि तारखेमध्ये फक्त 20 सप्टेंबर निवडा. यानंतर बुक तिकीट पर्यायावर क्लिक करा. आता सीट निवडा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करा. पैसे भरल्यानंतर तुमची सीट बुक केली जाईल.

तसेच जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केले तर तुम्हाला चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांमध्ये मिळेल. मात्र अतिरिक्त शुल्क चित्रपटगृहांनुसारच भरावे लागेल. जर तुम्हाला 99 रुपयांचे ऑफलाइन चित्रपटाचे तिकीट खरेदी करायचे असेल तर सिनेमाच्या दिवशी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा. तिथल्या तिकीट काउंटरवर जा, तुमची सीट आणि वेळ सांगा आणि तिकीट बुक करा.

News Title : National Cinema Day Offer

महत्वाच्या बातम्या-

निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील नेत्यानी विष घेत उचललं टोकाचं पाऊल, पुढे काय घडलं

रश्मी ठाकरे होणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?, चर्चेला उधाण

लग्न असो किंवा आजारपण PF खात्यातून काढता येणार ‘इतकी’ रक्कम; केंद्राचा मोठा निर्णय

T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्या संघावर पडणार पैशाचा पाऊस

… तर फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणारचं; कोणी दिला थेट इशारा

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now