नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर; ‘या’ उमेदवाराने मिळवला विजय

Nashik Teacher Constituency Election l लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र रंगले आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं दिसून येत आहे.

शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी :

या जागेसाठी गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली होती. मात्र या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवारकिशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं.

मात्र या चुरशीच्या लढतीत अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची मनाली जात होती. गेल्या 24 तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. मात्र आज सकाळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

Nashik Teacher Constituency Election l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं :

नाशिक मतदारसंघातील ही निवडणूक अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे गाजली होती. या निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आला होता. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाने देखील या जागेसाठी उमेदवार दिला होता.

तसेच, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठं आव्हान शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंसमोर होतं. अशातच आतापर्यंत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

News Title – Nashik Teacher Constituency Election

महत्त्वाच्या बातम्या- 

महत्वाची बातमी! पुढील दोन दिवस राज्यात पाऊस हजेरी लावणार का?

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; ‘या’ भागातील दोन गर्भवती महिलांना झाली झिकाची लागण

या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी

विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट