नाशिकमध्ये शिवसेनेने पहिला भगवा फडकवला! ‘या’ नेत्यांचा विजय

On: January 16, 2026 12:45 PM
Nashik Election Result
---Advertisement---

Nashik Election Result | नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. राहुल अशोक दिवे, आशा रफिक तडवी, पूजा प्रवीण नवले आणि ज्योती अनिल जोंधळे यांनी विजय मिळवत शिवसेनेला मोठी आघाडी मिळवून दिली आहे.

राजकीय समीकरणांना वेगळी दिशा :

15 जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर आज, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली असून नाशिकसह राज्यभरातील जनतेचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. (Nashik municipal corporation)

प्रभाग क्रमांक 15 आणि 16 हे दोन्ही प्रभाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात, त्यामुळे पहिल्या निकालानेच शहरातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा दिल्याचं चित्र आहे.

Nashik Election Result | सिडको परिसरात शिवसेनेची सरशी :

प्रभाग क्रमांक 16 हा सिडको बस डेपो, विनयनगर, राणेनगरचा काही भाग आणि सिडकोच्या चौथ्या योजनेचा समावेश असलेला परिसर असून तो व्यापारी आणि नागरीदृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. 2017 च्या निवडणुकीत येथे विविध पक्षांचे प्रतिनिधी निवडून आले होते. मात्र यावेळी शिवसेनेने चारही जागा जिंकून या प्रभागावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. (Nashik Election Result 2026)

या विजयामुळे नाशिक महापालिकेतील पुढील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून उर्वरित प्रभागांचे निकाल जाहीर होताच शहरातील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या या दमदार सुरुवातीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

News Title: Nashik Municipal Corporation Election Results 2026: Shiv Sena Sweeps Ward 16

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now