“बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्यानेच..”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

On: August 22, 2024 2:16 PM
Nana Patole reaction on Badlapur case
---Advertisement---

Nana Patole | बदलापूरमधील शाळेत दोन चिमूरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी आता विरोधी पक्षाकडून महायुती सरकारला टार्गेट केलं जातंय. यावर बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या शाळेबाबत एक मोठा दावा केला आहे.

बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी आज (22 ऑगस्ट)नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

“बदलापूरमधील ती शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची आहे. म्हणूनच पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.”, असा आरोप पटोले यांनी केलाय.

तसेच, सरकार या विषयाचे राजकारण करत असून 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला असल्याचं पटोले म्हणाले.(Nana Patole )

कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना फटकारलं

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आज याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी ही सुनावणी पार पडली. (Nana Patole )

आम्हाला याबद्दल फक्त माहिती देऊ नका. याची कागदपत्रे किंवा रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट, केस डायरीही आम्हाला दाखवा, असे आदेश कोर्टाने दिले. तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवण्यास दिरंगाई का केली गेली, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला.

News Title :  Nana Patole reaction on Badlapur case

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीचा मोठा प्लॅन; आदित्य ठाकरेंविरोधात हा बडा नेता निवडणूक लढवणार?

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आता कधी होणार?

शरद पवारांना कोण मारणार? भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला

अंगावर येईल काटा! पुणे-नगर महामार्गावरील अपघातात एक जण ठार

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now