Nana Patole | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये धूसफुस होताना दिसत आहे. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही चर्चा झाली नसताना उद्धव ठाकरे यांनी चार जागांवर दावा केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिकमधील उमेदवार मागे घेण्यास सांगितलं आहे. तर नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन घेणं टाळलं.
“उमेदवार मागे घ्या”, नाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंना निरोप
महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याआधी चर्चा केली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. मुंबईतून ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र ठाकरेंनी नाशिक शिक्षक उमेदवार आणि कोकण पदवीधर उमेदवार मागे घ्यावेत, असा निरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
चारही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा न करता उमेदवारी दिली आहे. यामुळे आता काँग्रेस नेते यांच्यात नाराजीचा सूर आहे. यामुळे आता काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला देखील देखील संतप्त झाले आहेत. दरम्यान नाना पटोलेंचा फोन घेणं आता उद्धव ठाकरे यांनी टाळलं आहे.
ठाकरेंनी नाना पटोलेंचा फोन घेणं टाळलं?
नाना पटोले म्हणाले की, ते लंडनमध्ये गेले असताना त्यांना मी फोन केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण दोन-दोन जागांवर लढू. त्यावेळी ते म्हणाले की तुमचे उमेदवार कोण आहेत? मग मी उमेदवारांची नावे सांगितली आहेत. मूळ प्रश्न आहे की, चर्चा केली असती तर या चारही जागांवर निवडून येणं सोपं झालं असतं. मी त्यांना फोन केला मात्र त्यांचे ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत असल्याचं उत्तर देत आहेत. माझा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे माहिती नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
आम्ही मुंबईमध्ये आमचे उमेदवार दिले नाहीत. त्यांनी मुंबईमध्ये त्यांचा उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवावी अशी भूमिका काँग्रेसची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे. मात्र जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप आहे. मुंबईची जागा काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास तयार आहे. मात्र कोकण आणि नाशिकसाठी काँग्रेस आग्रही आहेत.
News Title – Nana Patole On Uddhav Thackeray Over Withdraw From Nashik Vidhansabha Candidate
महत्त्वाच्या बातम्या
“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!
शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापुर्वी ही बातमी वाचाच!, नाहीतर बसेल मोठा फटका
‘सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे’, सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला समस्यांचा पाढा
सर्वसामान्यांना दणका! कांदा पुन्हा रडवणार, दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ






