“राज्य सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ..”; नाना पटोले यांचा खोचक टोला

Nana Patole | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयात देवदर्शनांचा तसेच तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेता यावं यासाठी तीर्थदर्शन योजनेची मोठी घोषणा केली. ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयात देवदर्शन आणि तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता येणं अवघड असतं, म्हणूनच ही योजना आणली आहे. या घोषणेबाबत आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली असल्याचा टोला लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने आपली जागा दाखवली आहे. काल बजेट सादर केलं, घोषणा केल्या पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करत असल्याचं नान पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

वारकरी लोकं येऊन गेली. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी त्याला तोडता कसं येईल, याचा प्रयत्न सरकाने केला आहे. निरर्थक गवगवा सरकार करत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी, असं सगळं झालं असल्याचं, नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

तीर्थदर्शन योजना थोडक्यात माहिती

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करण्याची मागणी केली. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण अर्थिक स्थिती नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. ही योजना लागू केल्याने ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन लागू करण्यात येईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली.

सर्वांना उतरत्या वयात अर्थिकदृष्ट्या देवदर्शन करणं परवडत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसं इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना अर्थिक अडचणीमुळे  जाता येत नाही. अशा व्यक्तींना आता तीर्थदर्शन करता येणार आहे. याबाबत शिंदे सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

News Title – Nana Patole On Eknath Shinde Over Mukhyamantri Tirtha Darshan Yojana

महत्त्वाच्या बातम्या

बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘या’ आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी!

“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार घडवणार देवदर्शन, एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट