पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माय मराठीतून शपथ; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

On: June 25, 2024 7:47 AM
Murlidhar Mohol
---Advertisement---

Murlidhar Mohol l लोकसभेच्या 18 व्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मराठी भाषेत लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. खुद्द खासदार मोहोळ यांनी याबाबतचा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

खासदार मुरलीधर मोहोळांचा व्हिडीओ होतोय व्हायरल :

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हा व्हिडीओ शेअर करताना सांगितले की, मी लोकसभा सदस्याची शपथ ही मातृभाषा मराठीत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची पोस्ट मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

महाराष्ट्रात भाजपने लोकसभेच्या एकूण 9 जागा जिंकल्या. यापैकी एक जागा पुण्याचीही आहे. या जागेवर आधी काँग्रेसचे वारसाच होते. मात्र यंदाच्या म्हणजेच 2024 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा 1 लाख 23 हजार 38 मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

Murlidhar Mohol l महाराष्ट्राच्या खासदारांनी घेतली मराठीतून शपथ :

लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली तेव्हा भारतातील अनेक भाषिक वैविध्यता पाहायला मिळाली आहे. बहुतांश सदस्यांनी हिंदीतून तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली. मोदी मंत्रिमंडळात पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आलेले सदस्य आणि राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली.

News Title : Murlidhar Mohol Takes Oath In Marathi Language

गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ होणार

उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य; सायबेजखुशबू शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू

“…अन्यथा आम्ही विखेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही”

सरोगेट मातांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!

‘या’ 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; तुमचा कधीही पराभव होणार नाही

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now