Mumbai Water Supply l ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाण्याचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागामधील पाली हिल जलाशय 1 ची जुनी झालेली मुख्य जलवाहिनी निष्कासित करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे पश्चिम या भागातील आर. के. पाटकर मार्गावर व रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 या दरम्यान नव्याने टाकलेल्या 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा सामना करावा लागणार आहे.
पाणी जपून वापरा, उद्या पाणीपुरवठा बंद राहणार :
मुंबई महापालिकेका ही दोन्ही कामं उद्या म्हणजेच 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजल्या दरम्यान करणार आहे. त्यामुळे या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी एक दिवस पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
ज्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच पाणी देखील जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्ती झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा सुरु होणार आहे. याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
Mumbai Water Supply l या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार :
पेरी परिक्षेत्र- वांद्रे पश्चिमचा काही भाग, शेरली राजन मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, वरोडा मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10 ते दुपारी 2) या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
खार दांडा परिक्षेत्र- खार दांडा कोळीवाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, दांडपाडा, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी 5.30 ते रात्री 8.30) या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पाली पठार, खार पश्चिमेच्या काही भागात, पेस पाली गावठाण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री 9 ते 12) या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
News Title : Mumbai Water Supply cut from 30 August
महत्त्वाच्या बातम्या-
सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन
Jio चा ग्राहकांना आणखी एक दणका?, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सोन्याचा दिलासा?, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव
देशात झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स, ‘या’ 6 पद्धतीने करा स्वत:चं संरक्षण






