मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी ‘या’ भागात 14 तास पाणीपुरवठा बंद; BMC चा महत्त्वाचा सल्ला!

On: July 29, 2025 4:44 PM
Mumbai Water Cut
---Advertisement---

Mumbai Water Cut | मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्यातील पाली हिल जलाशयावर इनलेट आणि आउटलेटवर चार झडप बदलण्याचं काम गुरुवारी (31 जुलै 2025) करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत, एकूण 14 तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. (Mumbai Water Cut)

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार :

हनुमान नगर
लक्ष्मी नगर
युनियन पार्क (रस्ते क्र. 1 ते 4)
पाली हिल
चुईम गावाचे काही भाग

Mumbai Water Cut | या भागांमध्ये पाण्याचा दाब कमी होणार :

बांद्रा आणि खार परिसरातील काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे भाग म्हणजे:

कान्टवाडी, पाली नाका, पाली गाथन, शेरली
खारमधील राजन व माळा वस्ती, खार दांडा कोळीवाडा
दांडपाडा, चुईम गाथन
गाझधरबंद झोपडपट्टीचे काही भाग
पश्चिम खारमधील काही भाग

नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? :

बीएमसीने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:

– आधीच पाणीसाठा करून ठेवा
– पाणी वापरण्याची शिस्त पाळा आणि काटकसरीने वापरा
– पुढील 4-5 दिवस पाणी उकळून व गाळून वापरा
– अनावश्यक वापर टाळा आणि शेजाऱ्यांनाही माहिती द्या

या कामामुळे जलपुरवठा प्रणालीतील कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार असून, भविष्यातील अडथळ्यांचा सामना कमी होईल, असं बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

News Title: Mumbai Water Cut on July 31: 14-Hour Shutdown in Bandra and Khar, BMC Advises Caution

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now