मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ ३ वॉर्डात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

On: December 11, 2025 3:46 PM
Mumbai water cut
---Advertisement---

Mumbai water cut | मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घरातील पाण्याचा साठा आधीच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या मोठ्या जलवाहिनीच्या जोडणीची महत्त्वपूर्ण कामे हाती घेतल्यामुळे हा दोन दिवसांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. या काळात अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर या तीन वॉर्डांमध्ये १२ डिसेंबर सकाळी ९ पासून १३ डिसेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एकूण २४ तास हे काम सुरू राहील. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व, वांद्रे पूर्व, सांताक्रूझ पूर्व, धारावी, माहीम, कोळीवाडा, दादर परिसरातील काही भागांना या कामाचा थेट परिणाम जाणवणार आहे. (Mumbai water supply)

जी उत्तर वॉर्डातील भागांत पूर्ण पाणीबंदी :

जी उत्तर वॉर्डातील (G-North ward) अनेक भागांमध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यात धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक यांचा समावेश आहे. या सर्व भागांत १२ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहील.

तसेच जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवाडा, महात्मा गांधी मार्ग येथे १३ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद असेल. रहिवाशांना या दोन दिवसांत मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे पर्यायी पाण्याची सोय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai water cut | के पूर्व वॉर्ड भागात काही ठिकाणी कमी दाब :

के पूर्व वॉर्डांत (K-East ward) १२ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. विजयनगर मरोळ, मिलिटरी रोड, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा, आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, भवानीनगर, मामा गॅरेज, चकाला, मालपा डोंगरी १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजीनगर, मुकुंद रुग्णालय परिसर या सर्व भागांत १२ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहील.

तर काही भागांत पाणीपुरवठा पूर्ण बंद नसला तरी कमी दाबाने मिळणार आहे. यामध्ये कोलडोंगरी, जुनी पोलिस गल्ली, विजयनगर (सहार रस्ता), मोगरपाडाचा समावेश आहे. १३ डिसेंबरला ओमनगर, कांतीनगर, राजस्थान वसाहत, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहारगाव, सुतारपाखडी या भागांत पाणीपुरवठा बंद राहील. (Mumbai water cut)

एच पूर्व वॉर्डातही पाणीपुरवठा बंद :

एच पूर्व वॉर्डातही (H-East ward) पाणीपुरवठ्याचा मोठा परिणाम होणार आहे. संपूर्ण बीकेसी, मोतीलाल नगर या भागांमध्ये १२ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर प्रभात वसाहत, टिस-तीन, आग्रीपाडा, कालीना, सीएसटी मार्ग, विद्यापीठ परिसर, तीन बंगला, शांतिलाल आणि पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार सब-वे ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, सरकारी वसाहत वांद्रे (पूर्व) येथे १३ डिसेंबरला पाणी मिळणार नाही.

शहरातील मोठ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व जोडणीच्या कामांमुळे हा मोठा उपाययोजना कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या तीनही वॉर्डांतील नागरिकांनी या दोन दिवसांसाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवणे अत्यावश्यक आहे.

News Title: Mumbai Water Cut: 48-hour water supply disruption in K-East, H-East & G-North wards – Full area list

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now