Mumbai Today Weather | मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने कहर केला. यामुळे मुंबईतील घाटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली. यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (Mumbai Today Weather)
मुंबईसह महाराष्ट्रात काय वातावरण?
काल मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर आज मुंबईमधील आणि राज्यातील इतर हवामानावर भाष्य करण्यात आलं आहे. आज मुंबईमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Mumbai Today Weather)
मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची दाट शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं हवामान खात्याने आवाहन केलं आहे. (Mumbai Today Weather)
मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होताना दिसतो. हलका ते मध्य मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर आता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाने सांगितलं आहे.
अवकाळी पावसाने मुंबईकरांवर काळाचा घाला घातला. घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपवर भलं मोठं होर्डिंग पडल्याने पेट्रेलपंपाखाली काही लोकं अडकली गेली. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले तर काहींना त्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. तसेच 100 लोकं या पेट्रोल पंपाखाली अडकले होते. अडकलेल्या 74 जणांना बाहेर काढण्यात आलं. काही जखमींवर राजावडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्याच अवकाळी पावसाने मुंबईमध्ये मोठं नुकसान झालं. (Mumbai Today Weather)
वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे विमान सेवा विस्कळीत झाली. वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली. यामुळे आता नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.
News Title – Mumbai Today Weather Update News
महत्त्वाच्या बातम्या
उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा






