मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास

On: July 8, 2024 1:19 PM
Mumbai Rain Update
---Advertisement---

Mumbai Rain | मुंबईमध्ये (Mumbai Rain) कालपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईची (Mumbai Rain) पहिल्या पावसामध्ये तुंबई झाली आहे. याचा फटका आता आमदारांनाही बसलाआहे. कारण अनेक आमदार हे एक्सप्रेसने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहत असतात. मात्र रेल्वेरूळावर पाणी साचल्याने रेल्वेलाईन बंद असल्याने आता आमदारांना पायी चालत प्रवास करावा लागत आहेत.

अमोल मिटकरी एक्सप्रेसमध्ये अडकले

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे काही आमदारांनी रेल्वे रूळावरून चालत प्रवास केला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांनाही मुंबईतील मुसळधार पावसाचा (Mumbai Rain) फटका लागला आहे. मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. (Mumbai Rain)

हावडा एक्सप्रेसही बराच काळ कुर्ला येथे अडकली होती. या एक्सप्रेसने कॅबिनेटमंत्री अनिल पाटील, संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार प्रवास करत होते. हे सर्व आमदार अधिवेशनासाठी मुंबईत निघाले होते.

“कुर्ला स्थानकाजवळ राज्याचे मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मी आणि आणखी या ट्रेनमध्ये इतर आणखी सात ते आठ आमदार अडकून आहेत. सध्या अनुभव घेत आहोत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. त्या अधिवेशनासाठीही प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो. याचा सर्वसामान्य लोकांनाही फटका बसतो.”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय गायकवाड?

रेल्वेरूळात पाणी साचल्याने अमोल मिटकरी यांच्यासोबत अमोल गायकवाड देखील रेल्वेरूळावरून चालत प्रवास करताना दिसून आले.  आम्ही कुर्ला स्टेशनच्या मागे आहोत. माझ्या गाडीत इतरही आमदार आहेत. आमच्या गाडीच्या पुढे हावडा एक्सप्रेस अडकलेली आहे. मी अमरावती एक्सप्रेसने प्रवास करत आहे. अनेक आमदार पायी प्रवास करत निगाले असल्याचं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

काही बैठका देखील होणार आहेत. त्यामुळे लवकर कधी पोहोचू हे सांगता येत नसल्याचं संजय गायकवाड म्हणाले आहेत. आम्हाला पायी चालायला काही हरकत नाही. पण रस्त्यावरही पाणी साचलं आहे. त्यामुळे तिथेही अडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

News Title – Mumbai Rain Water Logging In Railway Track

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…

आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट

या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी

पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप

Join WhatsApp Group

Join Now