मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, पण खिसा रिकामा होणार? ‘मिसिंग लिंक’ पुलासाठी किती मोजावा लागणार टोल?

On: February 24, 2026 3:49 PM
Mumbai-Pune Expressway
---Advertisement---

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच सेवेत येणार आहे. MSRDC ने सांगितले की हा प्रकल्प १५ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि १ मे २०२६ पासून प्रवाशांसाठी मार्गिका उपलब्ध होईल. या नव्या लिंकमुळे प्रवासाचा वेळ सुमारे २५-३० मिनिटांनी कमी होणार आहे आणि धोकादायक लोणावळा-खंडाळा घाटातून जाण्याची गरज नाही राहणार.

मिसिंग लिंक आणि प्रवासाचा फायदा :

१३.३ किलोमीटर लांबीचा हा विभाग मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा आणि लोणावळा दरम्यानच्या १९.८ किलोमीटरच्या मार्गाला बायपास करणार आहे.

या लिंकमुळे प्रवाशांचे अंतर अंदाजे ६ किलोमीटर कमी होईल. रोजच्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार असून प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल.

Mumbai-Pune Expressway | टोल दर आणि प्रशासनाचे स्पष्टीकरण :

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरु झाल्यावर टोल दरात कोणतीही अचानक वाढ होणार नाही. सध्याच्या टोल रचनेनुसार कार/जीपसाठी एका बाजूचा (one-way) टोल सुमारे ३२० रुपये आहे, फास्टॅगद्वारे वसूल केला जातो. (Mumbai-Pune Expressway News)

टेम्पो साठी ४९५ रुपये, बससाठी ९४० रुपये, डबल एक्सल ट्रकसाठी ६८५ रुपये, तीन एक्सल ट्रकसाठी १,६३० रुपये आणि मल्टी एक्सल ट्रकसाठी २,१६५ रुपये टोल आकारला जातो. टोल वसुलीची अंतिम मुदत २०४५ पर्यंत वाढवण्यात आली असून दर पाच वर्षांनी आढावा घेऊन सुधारणा करता येणार आहेत, पुढील सुधारणा २०३० मध्ये अपेक्षित आहेत.

News Title: Mumbai-Pune Missing Link Toll Details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now