Mumbai- Pune Expressway Accident | पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक मोठं तिर्थक्षेत्र आहे. अनेक भाविक भक्त हे पंढरपूरला येत असतात. आषाढी कार्तिकीसाठी डोंबिवलीतून एक बस पंढरपूरला चालली होती. त्यावेळी ती बस दरीत पडली. यामुळे मोठा अनर्थ झाला आहे. या बसमध्ये 54 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर काही प्रवासी हे जखमी आहेत. (Mumbai- Pune Expressway Accident)
प्रवाशांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंढरपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स ही दरीत 20 फुटावर पडली आहे. पहाटे अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये काही जणांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली आहे. (Mumbai- Pune Expressway Accident)
काय म्हणाले डीसीपी विवेक पानसरे?
विवेक पानसरे म्हणाले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात (Mumbai- Pune Expressway Accident) झाला. एक खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत कोसळली. त्यातील अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं विवेक पानसरे म्हणाले आहेत.
भाविकांनी भरलेली बस ही डोंबिवली येथील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाला.
पाच प्रवाशांवर काळाचा घाला
येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. परंतु पाच प्रवाशांवर काळाने घाला घातला. आषाढी एकादशीला वारकरी राज्यभरातून दिंडीद्वारे पंढरपूरला जात आहेत. ज्यांना दिंडीमार्गे जाता येत नाही तेव्हा भाविक दिंडीमार्गे पंढरपूर गाठतात. यावेळी पंढरपूरला जात असताना हा अपघात झाला. (Mumbai- Pune Expressway Accident)
News Title – Mumbai- Pune Expressway Accident Pandharpur Bus Fell In Valley
महत्त्वाच्या बातम्या
23 वर्षीय तरूणीने संपवलं आपलं जीवन, मरीन ड्राईव्हवरून समुद्रात घेतली उडी
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!
“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका
“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य






