सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!

On: September 24, 2024 1:14 PM
mumbai news
---Advertisement---

Mumbai News | सुप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर लाडवाच्या प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. मंदिरात आलेल्या भक्तांना लाडवाचा प्रसाद दिला असताना यामध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, हा वाद ताजा असतानाच आता मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर अशाच प्रकारामुळे चर्चेत आलं आहे. मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांची पिल्लं आढळ्याचं समोर आलं.

काय आहे प्रकार?

मुंबई (Mumbai News) येथील सिद्धीविनायक मंदिरात रोज  हजारो भाविक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. यावेळी त्यांना प्रसाद देखील दिला जातो. मात्र सध्या चर्चा आहे ती मंदिरातील  प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये टोपलीत असलेल्या लाडूचे प्लॅस्टिक उंदारने कुरतडल्याचं म्हटलं जातं. दरम्यान मंदिराचे ट्रस्टी सदा सरवणकर यांनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले सदा सरवणकर?

समोर आलेला व्हिडीओ मंदिर (Mumbai News) परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असं सरवणकर म्हणाले. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू रोज बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. यानंतर तमाम हिंदू भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मंदिरावर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे.

News Title : mumbai news siddhivinayak temple prasad goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय शिंदेच्या हातात बेड्या, तोंडावर काळा बुरखा, तरीही पोलिसांवर हल्ला कसा?

अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं?, फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा!

अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!

“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now