BMC election Result | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने पहिलाच निकाल आपल्या बाजूने खेचून घेत मोठी उलथापालथ घडवली आहे. बीएमसी वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काँग्रेसच्या (Congress victory Mumbai) आशा काळे यांनी विजय मिळवत पक्षाचं खातं उघडलं असून त्यांनी शिंदे गट आणि मनसेला एकाच वेळी धक्का दिला आहे.
या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष :
आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा तब्बल 1450 मतांनी पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी असून त्या माजी नगरसेविकाही आहेत. ( BMC ward 183 result)
त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलं होतं. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पारुबाई कटके यांनाही या वॉर्डमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
BMC election Result | धारावीत काँग्रेसचा विजयाचा गुलाल :
हा विजय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बालेकिल्ल्यात मिळाल्याने पक्षासाठी तो अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. धारावी परिसर हा काँग्रेस आणि गायकवाड कुटुंबाचा मजबूत गड मानला जातो. याच भागातून काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीतील आपला पहिला झेंडा रोवला आहे. (BMC election Result)
मुंबई महापालिकेच्या निकालांमध्ये आता प्रत्येक फेरीसोबत नवे राजकीय समीकरण तयार होत असून काँग्रेसच्या या सुरुवातीच्या विजयामुळे पुढील निकालांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





