Mumbai Metro Job | मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांसाठी निर्माण झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबत भरती जाहीर केली आहे.विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज भरून घेण्यास सुरूवात करावी. (Mumbai Metro Job)
मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करावेत. इच्छुक उमेदवार mmrcl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. याचे अर्ज सुरू झाले आहेत.
मुंबई मेट्रोत अर्ज करण्याची शवेटची तारीख ही 12 ऑक्टोबर 2024 आहे. आता इच्छुक उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे त्वरित अर्ज करावेत. मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजरच्या 2 जागा तर असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 5 जागा भरल्या जाणार आहेत.असिस्टंट मॅनेजरसाठी 2 जागा आहेत.
वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
तसेच, डेप्युटी इंजिनियर पदासाठी 1 रिक्त जागा आहे. ज्युनिअर इंजिनियरसाठी 1 रिक्त जागा आहे. मुंबई मेट्रोत एकूण 11 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे असावी.
तर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियरसाठी वयोमर्यादा 35 वर्ष निश्चित करण्यात आलीये. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. (Mumbai Metro Job)
पगार किती असणार?
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना 80 हजार ते 2, 20,000 रुपये पगार देण्यात येईल. असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना 70 हजार ते 2, 00, 000 रुपये पगार देण्यात येणार आहे.असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये पगार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. (Mumbai Metro Job)
News Title – Mumbai Metro Job 2024
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य






