Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

On: December 16, 2023 3:37 PM
Suryakumar Yadav Mumbai Indians
---Advertisement---

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने शुक्रवारी सर्वात मोठी घोषणा करत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जाहीर केलं, यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईचा कर्णधार राहणार नसल्याचं स्पष्ट झालं. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाला चाहत्यांकडून मोठा विरोध होताना पहायला मिळत आहे. कोणी मुंबई इंडियन्सची जर्सी जाळत आहे तर कुणी झेंडा… काही फॉलोवर्सनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावरुन अनफॉलो करायला सुरुवात केली आहे.

अशातच आता एक नवा प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (INDvSA) असलेल्या आणि भारतीय T20 संघाची कमान सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. सूर्यकुमार यादवच्या या पोस्टचा लोक वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढताना दिसत आहेत.

सूर्यकुमारने नेमकी काय पोस्ट केलीय?

 

सूर्यकुमार यादवने ब्रोकन हर्टची इमोजी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर आणि हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूर्याने ही पोस्ट केली आहे. सूर्याच्या या पोस्टमुळे सूर्याच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न केला जात आहे. फॅन्स दोन प्रकारे या पोस्टचा अर्थ लावताना दिसत आहे.

त्या दोन शक्यता कोणत्या?

काहीच्या मते, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय सूर्यकुमार यादवला पटलेला दिसत नाही, त्यामुळे त्याने ही इमोजी पोस्ट केली असावी तर काहींच्या मते, सूर्यकुमार यादवला स्वतःला मुंबई इंडियन्सचा कर्णधार न केल्याचं दुःख आहे त्यामुळे त्याने ही इमोजी पोस्ट केली असावी.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये नव्हता, त्यावेळी रोहितनंतर मुंबईचा कर्णधार कोण होईल?, असा सवाल उपस्थित झाला तर सूर्यकुमार यादवकडे मुंबई इंडियन्सचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं, मात्र आता हार्दिकला कर्णधार केल्याने सूर्याचं हे स्वप्न तुटल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेल्या एका इमोजीमुळे क्रीडा वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे, मात्र त्याने पोस्ट केलेल्या या इमोजीमागं नेमकं काय कारण आहे हे फक्त सूर्यकुमार यादवलाच सांगता येऊ शकतं. आता सूर्या हे कारण उघड करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title: mumbai indians suryakumar yadav broken heart reaction

महत्त्वाच्या बातम्या-

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now