हार्दिक पांड्याला डच्चू, मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कॅप्टन!

On: March 19, 2025 1:25 PM
Mumbai Indians
---Advertisement---

Mumbai Indians Captain l आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी मोठी फेरबदल पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या नव्हे, तर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटसंदर्भात कारवाई केल्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी :

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यात संघाचे नियमित कर्णधार हार्दिक पांड्या खेळू शकणार नाहीत. त्यामुळे सूर्यकुमार यादव हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळेल.

गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ठरलेल्या वेळेत ओव्हर पूर्ण करू शकली नाही. यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Mumbai Indians Captain l बीसीसीआयचा ओव्हर रेट नियम :

पहिल्या उल्लंघनासाठी – 12 लाख रुपयांचा दंड
दुसऱ्या उल्लंघनासाठी – 24 लाख रुपयांचा दंड
तिसऱ्या उल्लंघनासाठी – 30 लाख रुपये दंड आणि एका सामन्याची बंदी

हार्दिकने एका कार्यक्रमात सांगितले, “मी भाग्यवान आहे की माझ्यासोबत तीन कर्णधार आहेत – रोहित, सूर्या आणि बुमराह. जेव्हा मला मदतीची गरज असते, तेव्हा ते सदैव माझ्यासोबत असतात.”

मुंबई इंडियन्ससाठी हा बदल तात्पुरता असला तरी सूर्यकुमार यादवसाठी ही कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

News Title: IPL 2025: Mumbai Indians Captain IPL 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now