सरकारचा मोठा निर्णय! वीज दर ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार

On: September 20, 2024 11:01 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवलेली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज दिली जात आहे. मात्र आता या योजने संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वीज स्वस्त होणार आहे.

वीज दर कमी होणार? :

यासंदर्भात शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी जमा केली जाणारी क्रॉस सबसिडी देखील संपुष्टात येणार आहे. तसेच वीज दरामध्ये 2 रुपये प्रतियुनिटपर्यंत कपात केली जाणार आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत उपकेंद्राजवळ सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना देण्याची योजना आहे. तसेच त्यासाठी सरकारी जमिनीचा देखील वापर केला जात आहे. मात्र जिथे सरकारी जागा उपलब्ध नाहीत तिथे लोकांकडून जमिनी घेतल्या जात आहेत असल्याचे लोकेश चंद्र म्हणाले आहेत.

Maharashtra l डिसेंबरपर्यंत 500 मेगावॅट उत्पादन सुरू होणार :

महाराष्ट्र राज्यात मार्च 2026 पर्यंत तब्बल16 हजार मेगावॅट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सोलर ॲग्रो लिमिटेडची स्थापना देखील करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 50 हजार एकर जमीन देखील संपादन करण्यात आली आहे. तसेच या योजनेंतर्गत 9200 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय येत्या डिसेंबरपर्यंत 500 मेगावॅट उत्पादन सुरू होणार आहे. दरम्यान, सध्या जरी 9200 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश देण्यात आले असले तरी पुढील काळात आणखी 3500 मेगावॅटचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. तसेच मार्च 2026 पर्यंत तब्बल 16 हजार मेगावॅट उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांमध्ये कृषीपंप जोडणीला मोठी मागणी येणार आहे.

News Title : Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana News

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! भाईजानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या फोटोने खळबळ

ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?

सोनं स्वस्त झालं की महाग?, सराफा बाजारात काय आहेत सध्या दर?

वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत

विधानसभेपूर्वीच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, कधी आणि किती रुपयांची होणार घसरण?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now