‘बहिणीनंतर आता मेव्हण्यांसाठी योजना…’; मोठी मागणी समोर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana । राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला. यामध्ये महिलांसाठी महत्त्वाची योजना आणण्यात आली आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत योजना 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रूपये दिले जाणार आहेत. समोवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरूवात झाली. आता या योजनेवरून एका शेतकऱ्याने सरकारला टोला लगावला आहे.

अशातच आता एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना साद घातली आहे.

“मेव्हण्यांसाठी योजना सुरू करा ना…”

मुख्यमंत्री साहेब बहिणींसाठी तुम्ही खूप चांगली योजना सुरू केलीये. मग मेव्हण्यासाठी पण अशीच योजना सुरू करा ना… मेव्हण्यांनी तुमचं काय घोडं मारलं. मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रूपये द्या, अशी मागणी एका शेतकऱ्याने केली आहे.

हा व्हिडीओ जळगावातील एका शेतकऱ्याचा आहे. खानदेशी शेतकरी हा खानदेशी बोलीभाषेत मुख्यमंत्र्यांपुढे आपलं  मागणं मांडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा होताना दिसत आहे.

काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महत्त्वाची माहिती समजून घेऊयात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना सरकारतर्फे महिन्याला 1500 रूपये देण्यात येणार आहेत. 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. 3.50 कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे.

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.

राज्यातील विवाहीत, अविवाहीत, घटस्फोटित आणि निराधर महिला.

किमान 21 वर्षे महिलेचं वय असावं ते कमाल 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत वय असावं.

लाभार्थ्यांचं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांहून अधिक नसावं.

News Title – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana For Female

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! पुण्यातील धबधबे ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद