“राम मंदिर तर बांधलं पण, शहरवासीयांचं जीवन..”; BJP च्या अयोध्येतील पराभवानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट

Mukesh Khanna | उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Ayodhya Lok Sabha Result) भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर बांधूनही येथे जनतेने मोदींना नाकारले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (Awadhesh Prasad) विजयी झाले आहेत.

तर भाजपाचे लल्लू सिंह (lallu Singh) यांचा येथे मोठा पराभव झाला आहे. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने लोकसभा निवडणूक लढवली. त्याच राम मंदिराच्या अयोध्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याने याची देशभर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवरच आता प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक पोस्ट केली आहे.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राम मंदिराचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अयोध्येत भाजपच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

मुकेश खन्ना यांची पोस्ट

“अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवं की, भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवावेत, मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू शामचं मंदिर असो.. श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका.तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या.”, अशी पोस्ट मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

अयोध्येत भाजपचा पराभव का झाला?

या पोस्टवर आता नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अयोध्येचा कायापालट कशा पद्धतीने झाला, याची तुफान चर्चा रंगली होती. या भागात भाजपच विजयी गुलाल उधळणार, असं म्हटलं जात होतं. पण, निकाल याच्या खूपच विरोधात आला.

राजकीय विश्लेषकांनुसार, अयोध्यामध्ये जातीय समीकरणाच्या मुद्द्यापेक्षा विकासाच्या आणि जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून जनतेच्या मनात नाराजीचं वातावरण होतं. भाजप उमेदवार लल्लू सिंग यांच्याविरोधात देखील नाराजीचं वातावरण दिसत होतं. याचा फटका भाजपला निवडणुकीत झाला.

News Title –  Mukesh Khanna post on Ayodhya Lok Sabha Result

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अवकाळी झोडपणार; हायअलर्ट जारी

‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ