एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश, आता अतिमोबाईल वापराल तर…

On: January 17, 2025 11:58 AM
Pune News
---Advertisement---

MSRTC l मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळला जात नाही आणि परिणामी एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन (Tarnishing Image) होत आहे, असा अजब दावा करत, एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यभरातील एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच मोबाईलवर बोलण्याचे आदेश दिले आहेत.

या अजब आदेशामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. अनेकदा तातडीच्या प्रसंगी किंवा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मोबाईलचा वापर करणे गरजेचे असते. अशावेळी, केवळ प्रतिमेचा विचार करून, मोबाईल वापरावर निर्बंध घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MSRTC l प्रतिमा जपण्यासाठी उपाय की कर्मचाऱ्यांवर अविश्वास? :

एसटी महामंडळाने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्याची गरज असताना, केवळ मोबाईल वापरावर निर्बंध घालून काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. हा आदेश म्हणजे कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार असल्याची टीकाही होत आहे.

महामंडळाने या आदेशाचा पुनर्विचार करावा आणि कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण न करता, खऱ्या अर्थाने प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

News Title: MSRTC’s Bizarre Order: Mobile Use Only For Essential Work

महत्वाच्या बातम्या-

‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘मी खूप रडले….’; ‘त्या’ व्हायरल किसींग सीनबाबत प्रिया बापट पहिल्यांदाच बोलली

हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती

अपघात झाल्यास कंत्राटदारांची खैर नाही…; नितीन गडकरी मोठा निर्णय घेणार

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now