MPSC परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

On: July 16, 2026 2:43 PM
MPSC
---Advertisement---

MPSC Examमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संगणक आधारित परीक्षा (CBT Exam) पद्धतीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू न करण्याचे निर्देश दिले असून, विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्याची परीक्षा पद्धती काही काळ कायम राहणार आहे.

ऑनलाइन परीक्षा टप्प्याटप्प्याने लागू होणार :

एमपीएससीच्या संगणक आधारित परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar), राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्यावर भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संगणकआधारित परीक्षा (CBT) तातडीने सुरू करण्याऐवजी ती ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

MPSC Exam | सध्याची परीक्षा पद्धती कायम; अंतिम निर्णय आयोगाचा :

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ऑगस्ट 2027 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच घेतल्या जातील. यामुळे ऑनलाइन परीक्षा त्वरित लागू होण्याबाबत व्यक्त होत असलेली विद्यार्थ्यांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. विद्यार्थी संघटनांनी सातत्याने केलेल्या मागणीला या निर्णयामुळे मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, संगणकआधारित परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणीसंदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतला जाणार आहे. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाने राबविलेल्या विविध सुधारणा उपक्रमांचेही कौतुक केले आणि भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी आवश्यक बदल नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश दिले.

News Title: MPSC CBT Exams Deferred Till 2027

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now