मंकीपॉक्स टेस्ट करणं झालं सोपं; अवघ्या ‘इतक्या’ वेळात होणार टेस्ट

On: August 27, 2024 1:54 PM
Mpox RT-PCR
---Advertisement---

Mpox RT-PCR l जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स या आजाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच या आजाराला जागतिक आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे. या विषाणूचा नवीन स्ट्रेन (क्लेड-1) अधिक संसर्गजन्य मानला जात आहे त्यामुळे मृत्यू दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता Mpoxशी लढण्यासाठी भारताने स्वतःची RT-PCR चाचणी किट तयार केली आहे. ज्याला सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने मान्यता देखील दिली आहे.

Mpoxशी लढण्यासाठी भारताने बनवले RT-PCR किट :

Siemens Healthineers ला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून IMDX मंकीपॉक्स डिटेक्शन RT-PCR किटच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमासाठी ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि मंकीपॉक्स या आणीबाणी विरूद्ध लढा देण्यासाठी हे एक मोठे पाऊल असणार आहे.

Siemens Healthcare Pvt Ltd ने सांगितले की, IMDX मंकीपॉक्स डिटेक्शन RT-PCR टेस्ट किट वडोदरा येथील आमच्या मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केले जाणार आहे, ज्याची उत्पादन क्षमता दरवर्षी 1 दशलक्ष प्रतिक्रियांची आहे. याशिवाय हे तयार केलेले किट देण्यासाठी देखील कारखाना पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत.

Mpox RT-PCR l या किटमुळे अवघ्या 40 मिनिटांत रिपोर्ट कळणार :

सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या मते, या किटसह केलेल्या चाचणीचा रिपोर्ट 40 मिनिटांत उपलब्ध होतील. जुन्या मंकीपॉक्स किटद्वारे रिपोर्ट 1-2 तासांत येत होता. या किटच्या माध्यमातून अवघ्या 40 मिनिटांत रिपोर्ट तुमच्यासमोर येणार आहे.

ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे द्वारे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित, ही चाचणी 100 टक्के संवेदनशीलता आणि विशिष्टतेचा दावा करते. IMDx मंकीपॉक्स RTPCR चाचणी किट भारतीय वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते आणि सर्वोच्च जागतिक मानकांचे पालन करत आहे.

News Title – Mpox RT-PCR Text

महत्त्वाच्या बातम्या-

निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?

बँकेत नोकरी करायचं स्वप्न होणार साकार; तब्ब्ल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट

पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now