“लाडक्या बहिणींना नोटीस पाठवून पैसे परत…”, संजय राऊतांनी केला धक्कादायक खुलासा

On: December 9, 2024 11:09 AM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीतील नेतेमंडळी वारंवार निशाणा साधत आहेत. अशातच आता या योजनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका :

यावेळी संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेवरुन आता महायुतीचे डोळे उघडले आहेत. या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. त्यामुळे आता ती योजना बंद करायला हवी. तसेच आता महायुतीच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत असा धक्कादायक खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच आता महाविकास आघाडीची एवढीच प्रार्थना आहे की, ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. तसेच त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा असे देखील सांगू नका. कारण तुम्ही काहीही करु शकता. हे जे काही सुरु आहे, त्यावर आमचं देखील बारीक लक्ष आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut l लाडक्या बहि‍णींची मतं विकत घेतलं :

याशिवाय कोणतीही शाहनिशा न करता सरसकट 1500 रुपयांचा जो व्यवहार केला त्यावर देखील अनेकांचा आक्षेप होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकष बदला असे सांगितले आहे. दरम्यान, याआधी निकष न बदलता पाच महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत.

कारण 1500 रुपयाला लाडक्या बहि‍णींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत झाला आहे. मात्र ती लाच होती. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्रं यासंदर्भात भान देखील राहिलं नाही. फक्त त्यांना विधानसभा निवडणुकीत मत विकत घ्यायची होती असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

News Title : MP Sanjay Raut comment on ladki bahin yojana

महत्वाच्या बातम्या –

“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार, IMD कडून अलर्ट

मोठी बातमी! लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 7000 रुपये, काय आहे नवी योजना?

“मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर ठरवा, आधी…”; ‘या’ बड्या नेत्याची महायुतीकडे मोठी मागणी

आज दुर्गाष्टमीला देवी दुर्गा ‘या’ राशींना देणार सुख-समृद्धी, धनलाभाचे देखील संकेत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now