Chandra Gochar 2026 | नवीन वर्ष 2026 ची सुरुवात होताच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली आहे. नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मन, भावना, सुख आणि मानसिक स्थितीचा कारक ग्रह मानल्या जाणाऱ्या चंद्राचे पहिले राशी गोचर झाले आहे. 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजून 30 मिनिटांनी चंद्राने वृषभ राशीतून बाहेर पडत मिथुन राशीत प्रवेश केला आहे.
नवीन वर्षातील हे पहिले राशी संक्रमण असल्याने त्याचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येणार आहे. विशेषतः तीन राशींसाठी हे चंद्र गोचर अत्यंत शुभ ठरणार असून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल, प्रगती आणि आनंदाची अनुभूती येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
नातेसंबंध आणि करिअरमध्ये गोडवा :
चंद्राच्या गोचरामुळे धनु राशीच्या जातकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक संकेत देणारी ठरणार आहे. कार्यस्थळी सुरू असलेले वाद किंवा गैरसमज दूर होतील आणि सहकाऱ्यांशी नातेसंबंध सुधारतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. प्रेमसंबंधात गोडवा राहील, मात्र आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार आणि दिनचर्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Chandra Gochar 2026)
मेष आणि धनु पाठोपाठ कुंभ राशीच्या जातकांनाही या चंद्र गोचराचा चांगला लाभ मिळणार आहे. व्यवसायात हळूहळू नफा वाढू लागेल आणि विस्ताराच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक स्थिती मजबूत राहण्याचे संकेत आहेत. कार्यस्थळी सुरू असलेले मतभेद संपून वातावरण अधिक सकारात्मक होईल. आरोग्याच्या बाबतीतही जानेवारी महिना तुलनेने सुरक्षित राहणार आहे.
Chandra Gochar 2026 | प्रगतीचे नवे मार्ग खुले :
चंद्र गोचरामुळे मेष राशीच्या जातकांसाठी 2026 च्या सुरुवातीला प्रगतीचे नवे मार्ग खुली होतील. मन लावून केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. अडकलेला पैसा मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने मिळू शकतो. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील, मात्र मानसिक ताण फारसा जाणवणार नाही.
एकूणच, नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेले चंद्राचे हे गोचर धनु, कुंभ आणि मेष राशींसाठी आशादायक ठरणार असून, करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.






