‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!

IND vs SA Final | आज संपूर्ण भारतीयांसाठी महत्वाचा दिवस आहे. आज 29 जूनरोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानतचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बार्बाडोसमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 11 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या दृष्टीने आज मैदानात उतरेल. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आजच्या सामन्याकडे लागलं आहे. अशात एका दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल एक मोठी भविष्यवाणी (IND vs SA Final ) केली आहे.

कोहलीचा खराब फॉर्म इंडियाची चिंता वाढवणार?

अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसरने मोठी (IND vs SA Final )भविष्यवाणी केली आहे. टीम इंडिया विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार असून कोहली फायनलमध्ये शतक करेल, असं त्याने म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना , “भारत टी-20 विश्वचषक 2024 ची फायनल जिंकेल आणि विराट कोहली शतक झळकावेल.”, असं मॉन्टी पानेसर म्हणाला आहे.

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा सध्या खराब फॉर्म सुरू असल्याचं दिसतंय. आयपीएल सामन्यात विराटचा फॉर्म चांगला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने स्पर्धेत 741 धावा केल्या होत्या. मात्र, सध्या वर्ल्डकपच्या सामन्यात विराटला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाहीये.

IND vs SA संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

SA : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन माक्ररम (कर्णधाक), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, ओटनील बार्टमन (IND vs SA Final )

News Title –  monty panesar prediction on IND vs SA Final  

महत्त्वाच्या बातम्या-

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट

पेन्शन संदर्भात सरकारने ‘हा’ नियम बदलला; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा

“खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे?”, शरद पवारांनी अर्थसंकल्पाचा हिशोब काढला

पुण्यासह नगरच्या काही भागांवर रात्री ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महत्वाची बातमी! ‘या’ कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर मिळणार!