Mohammed Shami Sister Scam l उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील जोया ब्लॉकमधील पलौला गावात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात क्रिकेटपटू मोहम्मद शमीची बहीण शबीना आणि तिचे पती गजनवी (Mohammed Shami Sister Scam) यांची नावे आल्याने प्रकरण अधिकच गाजू लागले आहे. जिल्हाधिकारी निधी गुप्ता वत्स यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून निधी वसुलीचे निर्देशही दिले आहेत.
३७४ दिवस काम, ७० हजार रुपयांचे वेतन? :
नोंदीनुसार, शमीची बहीण शबीना हिची मनरेगा योजनेत ४ जानेवारी २०२१ रोजी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर २१ मार्च २०२२ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत शबीनाने ३७४ दिवस मजूर म्हणून काम केल्याचे दाखवण्यात आले आहे. या कामाच्या बदल्यात तिच्या बँक खात्यात सुमारे ७० हजार रुपये जमा झाल्याचे सरकारी नोंदी सांगतात.
विशेष म्हणजे शबीना ही गावातील सध्याच्या गावप्रमुख गुले आयशा यांची सून आहे. शबीनाचे पती गजनवी यांचे नाव देखील मनरेगामध्ये मजूर म्हणून नोंदवले गेले आहे. गजनवीने ३०० दिवस काम केल्याचे दाखवून सुमारे ६६ हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. (Mohammed Shami Sister Scam)
Mohammed Shami Sister Scam l श्रीमंत असूनही मजूर म्हणून पैसे? :
शबीनाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी मजूर म्हणून पैसे घेतल्याचा आरोप आहे. ते गावातील एका आलिशान हवेलीत राहतात आणि जोया शहरात त्यांचा स्वतःचा फ्लॅट देखील आहे. गावप्रमुखांनीच आपला मुलगा आणि सून यांना या योजनेंतर्गत लाभ मिळवून दिला, असा संशय आहे. गावातील इतर अनेक श्रीमंत आणि नोकरदार लोकांचीही नावे मनरेगा मजूर यादीत आहेत, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या भावाने सांगितले की, “ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. आमची बहीण (Mohammed Shami Sister Scam) आमच्यापासून दूर, वेगळ्या गावात राहते. तिचं आमच्या कुटुंबाशी काहीही देणं-घेणं नाही. हे स्थानिक राजकारणातून आलेलं षड्यंत्र असू शकतं.” ते म्हणाले की, चौकशीनंतर सत्य समोर येईल.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वसुली होणार :
जिल्हाधिकारी निधी गुप्ता वत्स यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ज्या पद्धतीने गावप्रमुखांनी नातेवाईकांच्या खात्यात सरकारी पैसे जमा केले, त्या पद्धतीने वसुली केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल.”






