मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

On: November 1, 2023 9:48 AM
---Advertisement---

मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागच्या दोन दिवसांत शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसाचाराच गालबोट लागलं. दोन आमदारांची घर पेटवण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. यानंतर जरांगेंनी आंदोलकांना शांत राहण्यात आवाहन केलं. मात्र तरीही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

शिंदे गटाच्या आमदाराने एक प्रक्षोभक वक्तव्य केलय. आता मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मध्ये कोणी आला , तर त्याच्या नरडीचा घोट घेईन असं आमदाराने म्हटलं आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. आता मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मध्ये कोणी आला , तर त्याच्या नरडीचा घोट घेईन. त्याला फाडून खाईन, त्याचा जीव घेईन, असं संजय गायकवाड म्हणालेत.

दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे. मात्र गेल्या दोन दिवसात आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळत आहे. रविवारी मराठवाड्यातील एसटी बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. अशातच बीडमध्ये आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. बीडमध्ये काल आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

आंदोलकांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke ) यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या गाड्यांना आग लावली. तसेच माजलगावच्या नगरपरिषदेच्या मुख्य कार्यलयाला आग लावली. त्यानंतर आंदोलकांनी सायंकाळी बीड शहरामध्ये आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांच्या घराला आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आग लावली. बीड एसटी डेपोतील 72 बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र माजलगाव आणि बीड शहरामध्ये अशांतता पसरली होती. यानंतर बीडमध्ये संचारबंदी लावण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!

कांद्यानं उडवला हाहाकार!; भाव ऐकाल तर म्हणाल, आधी उगाच विकला???

ललित पाटील प्रकरणात नवा ट्विस्ट; पुणे पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now